‘दोन्ही हात आकाशाच्या दिशेने झाल्यावर होणारी मुद्रा’ आणि ‘नमस्काराची मुद्रा’ यांतून मिळणार्‍या ऊर्जेच्या स्रोतामध्ये साधकाला जाणवलेला भेद !

एकदा मी हात चोळत असतांना माझ्या दोन्ही हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने झाले आणि त्या वेळी ऊर्जेचा मोठा स्रोत हातांच्या बोटांच्या माध्यमातून माझ्या शरिरात जात होता आणि मला पुष्कळ संवेदना जाणवत होत्या.

सौ. मीनाक्षी इचलकरंजीकर यांना नामस्मरण करत असतांना आलेली अनुभूती

मला नामजप करतांना अकस्मात् माझ्या भोवती गुलाबी रंगाचे वातावरण निर्माण झाल्याचे जाणवले. काही वेळाने मला माझ्या कमरेच्या वरील भागात परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते.

उच्चपदस्थ नौदल अधिकारी आणि त्यांच्या पत्नी यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिल्यावर व्यक्त केलेले मनोगत !

आश्रमात पुष्कळ शांत आणि उत्साही वाटत होते. आश्रमातील स्वच्छता आणि शांत वातावरण, यांमुळे माझे मन एकदम उत्साही झाले. आश्रमाला भेट दिल्यावर मी ज्यांची कल्पना केली नव्हती, अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने नामजप होत असल्याविषयी साधकाला आलेल्या अनुभूती

भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर, आपल्या कृपाशीर्वादाने माझा नामजप पुष्कळ वेळ होत आहे.

रत्नागिरी येथील सौ. स्नेहा ताम्हनकर यांना श्री वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेवर वाहिलेल्या हळदी-कुंकवामध्ये ‘ॐ’चा आकार निर्माण झाल्याचे दिसणे

आषाढी एकादशी या दिवशी सायंकाळी ७.१० वाजता मी प्रतिसप्ताहाप्रमाणे श्री वैभवलक्ष्मीसमोर दिवा प्रज्वलित केला आणि देवीला हळदी-कुंकू वाहून नमस्कार केला. त्या वेळी देवीच्या प्रतिमेवर वाहिलेल्या हळदी-कुंकवामध्ये ‘ॐ’चा आकार दिसत असल्याचे माझ्या लक्षात आले.