२५ किलो चांदी आणि २ किलो सोने जप्त !
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) अपव्यवहारप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने ‘जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी’ आस्थापनाचे माजी व्यवस्थापक अश्विन कुमार यांच्या बेंगळुरू येथील घरात धाड टाकली. त्यामध्ये पोलिसांना २४ किलो चांदी आणि २ किलो सोने मिळाले आहे. टीईटी भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी यापूर्वी ‘जी.ए. सॉफ्टवेअर’च्या अश्विन कुमार यांना अटक केली होती. पेपरफुटी प्रकरणात अश्विन कुमार हे प्रीतीश देशमुख समवेत काम करत होते.
महाराष्ट्रात व्यापमं?। 2019-20 बरोबरच 2018 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतही कोट्यवधींचा घोटाळा#TETExam #examscam #Maharashtra #MarathiNews @VarshaEGaikwad @CMOMaharashtra @Dev_Fadnavis https://t.co/N3AN2NLPGn
— Mumbai Tak (@mumbaitak) December 21, 2021
या प्रकरणात पोलिसांनी २ स्वतंत्र गुन्हे नोंद केले असून आतापर्यंत तत्कालीन आयुक्त सुखदेव ढेरे, सुपे, ‘जी.ए. सॉफ्टवेअर’चे संचालक डॉ. प्रीतीश देशमुख, अश्विन कुमार, वर्ष २०२१ ची टीईटी परीक्षा घेणार्या आस्थापनाचे प्रमुख सौरभ त्रिपाठी यांना अटक केली आहे.