
जुन्नर (पुणे), २८ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘हरि ॐ तत्सत्’ या नामजपाच्या गजरात प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा महानिर्वाण उत्सव कार्तिक कृष्ण पक्ष नवमी, म्हणजेच २८ नोव्हेंबर या दिवशी कांदळी (जिल्हा पुणे) येथील त्यांच्या समाधीस्थळी भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. ‘श्री रामचंद्र देवस्थान ट्रस्ट’ आणि ‘प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’ यांच्या वतीने २७ अन् २८ नोव्हेंबर या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प.पू. बाबांचे छायाचित्र आणि त्यांच्या पादुका यांची पालखी !
२७ नोव्हेंबर या दिवशी प.पू. बाबांच्या समाधीची नित्य नैमित्तिक पूजा करण्यात आली. दुपारी भंडारा झाला. सायंकाळी सहाएकर परिसरापासून ते समाधी मंदिरापर्यंत प.पू. बाबांची प्रतिमा आणि पादुका यांची पालखी काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी समाधीची पूजा करण्यात आली. रात्री महाप्रसादानंतर संगीत आणि भजने यांचा कार्यक्रम झाला.
प.पू. बाबांच्या समाधीची पूजा करून अभिषेक !
२८ नोव्हेंबर या दिवशी सकाळी प.पू. बाबांच्या समाधीवर चंदनाचा लेप लावून समाधीची पूजा करून त्यावर अभिषेक करण्यात आला. भक्तांनी ‘हरि ॐ तत्सत्’ हा नामजप केला, तसेच प.पू. बाबांची भजने म्हटली. दुपारी भंडार्यानंतर उत्सवाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी प.पू. बाबांच्या धर्मपत्नी प.पू. (श्रीमती) जीजी, त्यांचे सुपुत्र पू. नंदू कसरेकर, डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले, पू. रामप्रभु महाराज, पू. गोखले गुरुजी यांसह प.पू. बाबांचे भक्तगण उपस्थित होते.
अधिवक्ता नागवेकर यांची ‘स्विगी’ला कायदेशीर नोटीस
वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) बसस्थानकावर प्रवाशांच्या गैरसोयींचा ‘प्रवास’ चालूच !
सौंदळ (राजापूर) येथे आढळले अश्मयुगीन कातळशिल्प
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
यावर्षी देशात ९०, तर महाराष्ट्रात ९८ टक्के पावसाची शक्यता !
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६