आपण केवळ प्यादे असल्याचा चांदिवाल समितीपुढे सचिन वाझे यांचा जबाब !

अनिल देशमुख यांच्यावरील खंडणी वसुलीच्या आरोपाचे प्रकरण

मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथील दंगलींत हात असलेल्या ‘रझा अकादमी’वर बंदी घाला !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी 

इयत्ता ७ आणि ८ वीचे प्रत्यक्ष वर्ग २५ नोव्हेंबरपासून चालू करण्यास शासनाची संमती

यासंदर्भातील आदेश २३ नोव्हेंबर या दिवशी सकाळी काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्याचे संचालक भूषण सावईकर यांनी दिली आहे.

पुस्तकातून स्पष्टपणे मांडलेली मते युवा पिढीसाठी उपयुक्त ठरतील ! – वैभव पुरंदरे, वरिष्ठ संपादक, टाईम्स ऑफ इंडिया

अभिनेत्री कंगणा राणावत यांच्या बोलण्याने ‘स्वातंत्र्यचळवळीचा अपमान होतो’, असे म्हटले जाते; मग स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘देशद्रोही’ म्हटले जाते, तेव्हा स्वातंत्र्यलढ्याचा अपमान होत नाही का ?

हिंगोली येथील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हादरे बसल्याने रायफलमधून गोळी सुटून सैनिकाचा मृत्यू !

या प्रकरणी रस्त्यांवरील खड्डे न बुजवणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित दोषी अभियंत्यावर कठोर कारवाई करून त्यांच्याकडून हानीभरपाई वसूल केली पाहिजे.

बांदा येथे २० लाख रुपयांच्या मद्याची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणी एकाला अटक

सातत्याने कारवाई होत असतांनाही मद्याची अवैध वाहतूक करणार्‍यांना त्याचा धाक वाटत नसेल, तर पोलीस आणि प्रशासन यांनी कारवाईचा अन्य पर्याय शोधला पाहिजे अन्यथा आता चालू असलेली कारवाई हे एक ढोंग ठरेल !

लहान मुलांना लस आणि ज्येष्ठांना बूस्टर डोस देण्याची मागणी केली आहे ! – आरोग्यमंत्री

शाळा चालू झाल्याने ११ ते २० वर्षे वयोगटांतील मुलांचा संपर्क वाढल्याने या वयोगटांतील कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडून ९४० कोटी रुपयांची रामनगर साखर कारखान्याची भूमी हडपण्याचा प्रयत्न ! – किरीट सोमय्या, नेते, भाजप

माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना येथील साखर कारखानाच्या खरेदीत अपव्यवहार केला आहे, या प्रकरणी ईडी’कडून चौकशी चालू आहे – किरीट सोमय्या

अमरावती येथील व्यंकटेश बालाजी मंदिरात होणारी धर्महानी टळली !

गुटखा-तंबाखू खाणार्‍या कामगारांना कामावरून काढून टाकले, सनातन संस्थेच्या साधकाच्या प्रबोधनाचा परिणाम !

गोवा विधानसभा निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोवा विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्च २०२२ या दिवशी संपुष्टात येत आहे आणि तत्पूर्वी निवडणूक होऊन नवीन सरकार स्थापन होणे क्रमप्राप्त आहे.