गुटखा-तंबाखू खाणार्या कामगारांना कामावरून काढून टाकले
सनातन संस्थेच्या साधकाच्या प्रबोधनाचा परिणाम ! – संपादक
अमरावती – येथील ४० वर्षांहून पुरातन असलेले आणि अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री व्यंकटेश बालाजी मंदिर येथे नूतनीकरणाचे कार्य चालू आहे. तेथे असणारे कामगार मुसलमान आहेत. काम करतांना गुटखा, तंबाखू खाऊन त्यांची पुडी तेथे फेकणे, बांधकामाच्या ठिकाणी मंदिर परिसरात गुळणी करणे, पान-गुटखा खाऊन भिंतीवर थुंकणे अशा प्रकारचे गैरप्रकार तेथे चालू होते. दर्शनासाठी गेलेले येथील सनातन संस्थेचे साधक श्री. हेमंत खत्री यांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी यासंदर्भात विश्वस्तांचे प्रबोधन केले, तसेच अमरावती शहरातील शहर कोतवाली पोलिसांना बोलावून तत्परतेने हा प्रकार लक्षात आणून दिला. पोलिसांनी कामगारांना समज देऊन ‘मंदिर परिसरात अपप्रकार आढळल्यास गुन्हा नोंद करण्यात येईल’, असे सांगितले. मंदिर विश्वस्तांनी या प्रकाराची गंभीर नोंद घेत अयोग्य वर्तणूक करणार्या कामगारांना काढण्यात आले आणि त्यांच्या जागेवर अन्य कामगारांची नेमणूक करण्यात आली. प्रबोधन करतांना श्री. खत्री म्हणाले, ‘‘मंदिरामध्ये असे प्रकार होणे उचित नाही. मंदिराचे पावित्र्य राखायला हवे. अन्य धर्मीय कामगार असल्याने ते मांसाहार आणि गोमांस भक्षण करतात. अशांना तुम्ही मंदिरात प्रवेश देत आहात. याविषयी विचार करायला हवा.’’