अनिल देशमुख यांच्यावरील खंडणी वसुलीच्या आरोपाचे प्रकरण
मुंबई – निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी चांदिवाल समितीसमोर खंडणी वसुलीच्या प्रकरणात ‘मी केवळ प्यादे आहे’, असा धक्कादायक जबाब दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर बारमालकांकडून खंडणी वसूल करत असल्याचा आरोप केला आहे.
Param Bir Singh’s extortion allegations against ex-Maharashtra HM Anil Deshmukh | Dismissed Mumbai Police officer Sachin Waze (file pic) tells Chandiwal committee that he’s just a small pawn in the case. He told the committee that he trusts them. He’ll be cross-examined tomorrow. pic.twitter.com/5aDGDhtWrC
— ANI (@ANI) November 22, 2021
यासाठी ते तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे त्यांना साहाय्य करत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यशासनाने चांदिवाल आयोग स्थापन केला आहे. २२ नोव्हेंबर या दिवशी चांदिवाल समितीने सचिन वाझे यांची चौकशी केली. त्या वेळी त्यांनी वरील जबाब दिला.