हणजूण परिसरात पार्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण

स्थानिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि आरोग्यावर परिणाम करणारा पर्यटन व्यवसाय काय कामाचा ?

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर येथे २ लाखांहून अधिक भाविक उपस्थित !

कोरोना संसर्गामुळे २ वर्षांनंतर भरलेल्या कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर येथे पुन्हा एकदा भक्तांची मांदियाळी जमली आहे. अनुमाने २ लाखांहून अधिक भाविक शहरात आले आहेत.

हळदोणा येथे बालदिनाच्या निमित्ताने एका लहान मुलांच्या कार्यक्रमात पक्षाचा प्रचार करण्याचा तृणमूल काँग्रेसचा प्रयत्न फसला !

कार्यक्रमाला कोकणी भाषा समजत नसलेले भाडोत्री बनावट पत्रकार उपस्थित

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १६ नोव्हेंबरला सांगली येथे करण्यात येणार्‍या आंदोलनात सहभागी व्हा ! – श्री. रावसाहेब देसाई, राष्ट्रीय अध्यक्ष, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

त्रिपुरा येथे झालेल्या कथित घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात धर्मांधांनी ठिकठिकाणी तोडफोड केली. याच्या निषेधार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने सांगलीत मारुति चौकाजवळ असणार्‍या शिवतीर्थावर १६ नोव्हेंबर या दिवशी सकाळी १० वाजता निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

पोलिसांनी भाजपचे नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांना केले स्थानबद्ध !

जे दंगल घडवतात, अशा रझा अकादमीच्या नेत्यांना स्थानबद्ध करण्याचे धाडस पोलीस दाखवतील का ? हिंदुत्वनिष्ठ नेते सहिष्णु असल्यामुळे पोलीस त्यांच्यावर लगेच कारवाई करतात, हे सत्य आहे.

अमरावती येथे उसळलेल्या दंगलीनंतर नागपूर पोलीस सतर्क !

अमरावती शहरात उसळलेली दंगल, जाळपोळ आणि दगडफेक या घटना लक्षात घेऊन शहर पोलीसदल सतर्क झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वात शहरभर पोलिसांनी ‘फ्लॅगमार्च’ केला.

नांदेड पोलिसांकडून ४०० जणांविरुद्ध गुन्हे नोंद !

त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद शहरात उमटल्यावर १२ नोव्हेंबर या दिवशी दगडफेक करून मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी वजिराबाद, शिवाजीनगर आणि इतवारा पोलीस ठाण्यात ४०० जणांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

मालेगाव शहरातील जनजीवन पूर्वपदावर; हिंसाचाराच्या प्रकरणी ५ गुन्हे नोंद !

त्रिपुरा येथे मुसलमान समाजाच्या विरोधात झालेल्या कथित घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी ‘रझा अकादमी आणि ऑल इंडिया सुन्नी जमेतुल उलेमा’ यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला हिंसक वळण लागले.त्यानंतर आता तेथील जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

नागपूर येथील रेल्वे कार्यालयातील सहकारी महिलेशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी २ अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

पीडित महिला रेल्वे विभागात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. दोन्ही अधिकारी पीडित महिलेला वारंवार त्यांच्या दालनात बोलवायचे. त्यांच्या कामात चुका काढून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत होते.

धार्मिक दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर कायमची बंदी घालण्यासाठी केंद्राकडे शिफारस करा !

धार्मिक दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर कायमची बंदी घालण्याची शिफारस राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे करावी, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.