धर्मांधांनी ठिकठिकाणी केलेल्या तोडफोडीचा निषेध

सांगली, १४ नोव्हेंबर (वार्ता.) – त्रिपुरा येथे झालेल्या कथित घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात धर्मांधांनी ठिकठिकाणी तोडफोड केली. याच्या निषेधार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने सांगलीत मारुति चौकाजवळ असणार्या शिवतीर्थावर १६ नोव्हेंबर या दिवशी सकाळी १० वाजता निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्वपक्षीय आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई यांनी केले आहे.
याच समवेत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांनी जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर अमरावती, नांदेड, मालेगाव, हिंगोली येथे झालेल्या घटनेचा निषेध करावा, असे आवाहनही श्री. रावसाहेब देसाई यांनी केले आहे.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती