गोंधळलेला पक्षच जात किंवा धर्म यांचे राजकारण करतो ! – काँग्रेस

पणजी – जेव्हा एखादा राजकीय पक्ष जात किंवा धर्म यांविषयी बोलतो, तेव्हा समजावे की, तो पक्ष गोंधळलेल्या स्थितीत आहे, असे मत गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केले. ‘आप’ने भंडारी समाजातील व्यक्ती मुख्यमंत्रीपदी नेमणार असल्याची घोषणा केल्याच्या पार्श्‍वभूमीवर गिरीश चोडणकर यांनी हे मत व्यक्त केले. (आप करत आहेत ते गोव्याच्या किंवा एकूणच समाजाच्या दृष्टीने अयोग्यच; पण आपवर टीका करणार्‍या काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत सत्ता टिकवण्यासाठी जात आणि धर्म यांचेच राजकारण केले. त्यामुळेच अल्पसंख्यांक डोईजड होऊन बसले. त्याचे काय ? – संपादक)

ते पुढे म्हणाले, ‘‘काँग्रेस पक्ष वाढत्या महागाईवरून राज्यात १७ नोव्हेंबरपासून एक आठवडा ठिकठिकाणी निदर्शने करणार आहे. या वेळी पक्षाचे वरिष्ठ नेते जनतेशी संवाद साधणार आहेत.’’