भाजपने ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकींत व्यय केले २५२ कोटी रुपये !

नवी देहली – आसाम, बंगाल, केरळ, पुद्दुचेरी आणि तमिळनाडू या ५ राज्यांमध्ये या वर्षी मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपने २५२ कोटी रुपये व्यय केले आहेत. त्याने एकट्या बंगालमध्ये अनुमाने १५१ कोटी रुपये व्यय केले आहेत. तृणमूल काँग्रेसने भाजपपेक्षा थोडे अधिक, म्हणजे १५४ कोटी २८ लाख रुपये व्यय केले आहेत. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या व्ययाच्या तपशिलातून ही आकडेवारी समोर आली आहे.

भाजपने आसाममध्ये ४३ कोटी ८१ लाख रुपये, केरळमध्ये २९ कोटी २४ लाख रुपये, पुद्दुचेरीमध्ये ४ कोटी, ७९ लाख रुपये, तर तमिळनाडूमध्ये २२ कोटी ९७ लाख रुपये व्यय केले.