बंगालमधील बांगलादेश सीमेवर घुसखोरी करणार्‍या गोतस्करांचा सैनिकांवर लोखंडी सळ्यांद्वारे आक्रमण

भारतीय सैनिकांच्या गोळीबारात २ बांगलादेशी गोतस्कर ठार

अशा घुसखोर तस्करांनी सैनिकांवर आक्रमण करण्यापूर्वीच, म्हणजे दिसताक्षणी त्यांना गोळ्या घालण्याचा आदेश सरकारने दिला पाहिजे ! – संपादक  

प्रातिनिधिक छायाचित्र

कूचबिहार (बंगाल) – येथील बांगलादेश सीमेवर रात्री काही गोतस्कर भारतीय सीमेत घुसखोरी करत असतांना सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी या गोतस्करांनी सैनिकांवर लोखंडी सळ्यांद्वारे आक्रमण केले. त्यामुळे सैनिकांना संरक्षणार्थ गोळीबार करावा लागला. यात २ बांगलादेशी गोतस्कर ठार झाले.