सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसर्‍या दिवशीही एस्.टी. कर्मचार्‍यांचा संप चालू

सावंतवाडी येथे कर्मचार्‍यांनी भजन करत शासनाचा निषेध केला, तर कणकवली येथे संपात सहभागी न झालेल्या शिवसेनाप्रणित कामगार सेनेच्या काही कर्मचार्‍यांवर संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांनी पुष्पवृष्टी करून निषेध नोंदवला.  

दोडामार्गमधील रस्त्यांच्या कामाचा कार्यारंभ आदेश निघाल्याने भाजपचे आंदोलन स्थगित

आमदार नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना चेतावणी देताना सांगितले की, ‘उपोषण स्थगित केले म्हणजे सुटलो, असा समज करून घेऊ नका. आमच्याकडे लोकशाहीने दिलेले अन्य मार्गही आहेत’, याची जाणीव ठेवा.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भ्रष्टाचारात गुंग असल्याने जिल्हा परिषदेचा ४३ कोटी रुपयांचा विकासनिधी परत गेला ! – हरि खोबरेकर, सदस्य, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वर्चस्व असलेली जिल्हा परिषद अकार्यक्षम असल्याचा आरोप

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंची झालेली दुःस्थिती !

‘स्वातंत्र्यापासून आजवर कोणत्याही पक्षाचे राज्यकर्ते आाणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी हिंदूंना धर्मशिक्षण दिले नाही. त्यामुळे आता हिंदूंना केवळ ‘रामायण, महाभारत’ हे शब्दच माहीत आहेत. त्यातील एकही शिकवण त्यांना आठवत नाही.’

हिंदूसंघटन हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील एकमात्र उपाय ! – वक्त्यांचा सूर

भारतात हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी विविध माध्यमातून हिंदूंना साहाय्य करणे आणि सर्व हिंदूंचे संघटन करणे या उद्देशाने कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती येथे ‘ओम मिनिस्ट्री-कर्नाटक’ यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय ‘हिंदू अधिवेशन’ यशस्वीरित्या पार पडले.

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या भूमिकेविषयी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका तटस्थ !

‘राष्ट्रीय प्रवक्ता’ या महत्त्वाच्या पदावर असूनही पक्षातील एकाही नेत्याचा पाठिंबा नाही.

नवाब मलिक यांच्या आरोपांत काहीही तथ्य नाही ! – आशिष शेलार, आमदार, भाजप

आमदार आशिष शेलार पुढे म्हणाले, “मलिक यांनी राजकारणाच्या नीच पातळीवर जाऊ नये. मुंबईच्या मारेकर्‍यांशी मलिक यांचे आर्थिक व्यवहार कसे ? याचे उत्तर द्या.’’

माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर साक्ष होणार !

कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या दंगलीच्या अनुषंगाने गोपनीय, तसेच इतर महत्त्वाची माहिती असल्याने पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची चौकशी होणार आहे.