नवाब मलिक यांच्या आरोपांत काहीही तथ्य नाही ! – आशिष शेलार, आमदार, भाजप

(डावीकडे) नवाब मलिक, (उजवीकडे) आशिष शेलार

मुंबई – कितीही खोदकाम केले, तरी आरोप करायलासुद्धा नवाब मलिक यांना काहीही सापडू शकलेले नाही. मलिक यांनी केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही, असे उत्तर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मलिक यांच्या आरोपांवर दिले. मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना मोठ्या पदावर बसवले’, असा आरोप केला होता.

या वेळी आमदार आशिष शेलार म्हणाले, ‘‘मुन्ना यादव यांच्यावर केवळ राजकीय खटले आहेत. त्यांच्यावर कोणतेही गुन्हेगारी प्रकरण नोंद नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांच्या काळात कुठलाही अपप्रकार झालेला नाही. ज्या हाजी अराफात शेख यांच्या भावाविषयी हे बोलत आहेत, तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. मलिक यांनी राजकारणाच्या नीच पातळीवर जाऊ नये. मुंबईच्या मारेकर्‍यांशी तुमचे आर्थिक व्यवहार कसे ? याचे उत्तर द्या.’’