भाजीपाला विकणारे छगन भुजबळ २५ वर्षांत २५ सहस्र कोटी रुपयांचे मालक कसे झाले ?
‘भाजीपाला विकणारे पालकमंत्री छगन भुजबळ २५ वर्षांत २५ सहस्र कोटी रुपयांचे मालक कसे झाले ? त्यांनी अधिकार नसतांनाही जिल्हा नियोजन निधीचे वाटप केले आहे. त्यामुळे त्यांचे पालकमंत्रीपद काढून घ्यावे’, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी ३० सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केली.