‘तिबोटी खंड्या’ हा आता रायगड जिल्ह्याचा ‘जिल्हा पक्षी’ ! – कु. अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड

रायगड – ‘तिबोटी खंड्या’ हा आता रायगड जिल्ह्याचा ‘जिल्हा पक्षी’ असणार आहे. हा पक्षी कर्नाळा अभयारण्यात आढळतो. तो अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. पर्यटनदिनाचे औचित्य साधून पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु. अदिती तटकरे यांनी रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या वेळी ही घोषणा केली. या पक्षाच्या तळव्याला तीन बोटे असल्याने त्याला ‘तिबोटी खंड्या’ असे म्हणतात.

तो मे आणि जून मध्ये प्रजननासाठी येतो आणि सप्टेंबर-ऑक्टोबरच्या काळात परत जातो. ‘तिबोटी खंड्या या पक्ष्याविषयी जनमानसात पुरेशी माहिती नाही. ती माहिती व्हावी आणि त्याचे संरक्षण अन् संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याला रायगड जिल्हा पक्षी घोषित करण्यात आले आहे’, असे कु. अदिती तटकरे यांनी सांगितले.