पुणे – पुणे महापालिकेकडून ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाजवळ असणार्या उद्यानाला वर्ष १९९१ मध्ये सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले होते. उद्यानाच्या फलकावर सावित्रीबाईंचा उल्लेख ‘साध्वी सावित्रीबाई फुले’, असा असल्याने ३० वर्षांनंतर हा वाद निर्माण झाला आहे.
‘पुणे महापालिकेकडून सावित्रीबाई फुले यांना हिंदुत्ववादी विशेषण लावण्याचा प्रयत्न होत आहे’, असा आरोप समता दलाने केला आहे. ‘महापालिकेने उद्यानाच्या नावात त्वरित पालट केला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी देऊन ‘सावित्रीबाईंच्या नावाअगोदर ‘क्रांतीज्योती’ विशेषण लावावे’, अशी मागणी समता दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांनी सावित्रीबाई यांच्या नावाच्या आधी असलेला ‘साध्वी’ हा उल्लेख झाकून टाकला आहे.
पुणे महापालिकेने ‘आम्हाला जसे वरून आदेश आले, त्याप्रमाणे आम्ही फलक लावला आहे’, असे स्पष्टीकरण दिले आहे. रिपाई खरात गटाचे सचिन खरात यांनी म्हटले आहे की, या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. ‘साध्वी’ नाव असलेली पाटी तात्काळ न हटवल्यास महापालिकेच्या विरोधात आंदोलन करू.