समन्स बजावताच नेते न्यायालयात जात असल्याने चौकशी कशी करायची ? – अंमलबजावणी संचालनालय
विविध भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये चौकशी करण्यासाठी समन्स बजावताच नेते न्यायालयाची पायरी चढत आहेत, मग चौकशी कशी करायची ? असा प्रश्न अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) अधिवक्त्यांनी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवरील सुनावणीप्रसंगी उच्च न्यायालयात उपस्थित केला.