सातारा, १ ऑक्टोबर (वार्ता.) – शहर पोलीस ठाण्यांतर्गत ९३ दुचाकी आणि १ चारचाकी वाहन बेवारस म्हणून नोंदीत आहेत. या सर्व वाहनांच्या इंजिन क्रमांक आणि चेसी क्रमांक यांच्या नोंदी आम्ही केल्या आहेत. नागरिकांनी पोलीस ठाण्यात येऊन पहाणी करून वाहनाची ओळख पटवून वाहन घेऊन जावे. अन्यथा वाहन बेवारस समजून त्यांचा शासकीय नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येईल, अशी माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.
भगवान निंबाळकर पुढे म्हणाले की, बेवारस वाहनांची यादी सिद्ध झाली आहे. पोलीस ठाण्यातून वाहन ओळखून घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्व नागरिकांना १ मासाची मुदत दिली आहे. संबंधित नागरिकांनी तातडीने या प्रक्रियेत सहभागी होऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.