साकीनाका घटनेतील क्रूरकर्म्याला देहदंडाची शिक्षा द्या ! – छत्रपती उदयनराजे भोसले, भाजपचे खासदार

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, ‘‘माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेचे दु:खही होते आणि खेदही वाटतो.

होमिओपॅथी उपचारपद्धतीला सर्वमान्यता मिळायला हवी ! – उज्ज्वल निकम, विशेष सरकारी अधिवक्ता

अ‍ॅलोपॅथीमध्ये अनेकदा औषधांचे विपरित परिणाम होतात; परंतु होमिओपॅथी त्याला अपवाद आहे. कोणतेही शस्त्रकर्म न करता किंवा इंजेक्शन न देता केवळ पांढ‍र्‍या गोळ्या प्रभावी ठरतात.

सोलापूरमधील चिंचगाव (टेकडी) येथील प.पू. रामानंद सरस्वती महाराज यांचा देहत्याग !

जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चिंचगाव (टेकडी) येथील प.पू. रामानंद सरस्वती महाराज (वय ९७ वर्षे) यांनी १३ सप्टेंबर या दिवशी देहत्याग केला. रात्री ७ वाजता त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. त्यानंतर त्यांनी देहत्याग केला. १४ सप्टेंबर या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चिपी येथील विमानतळाचे श्रेय घेणार्‍यांनी जिल्ह्यातील दुर्दशा झालेल्या रस्त्यांचेही श्रेय घ्यावे ! – परशुराम उपरकर, राज्य सरचिटणीस, मनसे

वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील विमानतळाचे श्रेय घेण्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात चढाओढ लागली आहे; मात्र सत्ताधार्‍यांकडे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी निधी नाही. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत.

‘बोगस शिक्षक भरती प्रकरणी’ जिल्हा परिषदेकडून पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट; गुन्हा नोंद !

बोगस शिक्षक भरती होणेच गंभीर आणि चिंताजनक आहे. यामध्ये सहभागी असणार्‍यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे

खारेपाटण येथे दीड लाख रुपयांचा गुटखा पोलिसांच्या कह्यात

मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण येथील पोलीस तपासणी नाक्यावर १३ सप्टेंबरला पोलिसांनी एका टेंपोची तपासणी केली. या वेळी पोलिसांना टेंपोत दीड लाख रुपयांचा गुटखा सापडला. पोलिसांनी गुटखा आणि वाहन कह्यात घेतले.

पत्नीची माहिती सांगत नसल्याच्या कारणावरून सासूची हत्या करणार्‍या धर्मांधाला पुण्यातून अटक !

१ सप्टेंबर या दिवशी धर्मांध शेख हा येरवडा कारागृहातून जामिनावर सुटला होता. तो कारागृहात असतांना त्याच्या पत्नीने दुसरा विवाह केला होता. शेख हा विलेपार्लेमधील बामनवाडा येथील रहिवासी आहे.

महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कुंभकोणी यांची भूमिका पडताळण्यात यावी ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

‘अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात न्यायालयाचे निकाल जात असल्याने यामागची कारणे शोधण्याची आवश्यकता उद्भवली आहे. त्यामुळे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या भूमिकेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करणार आहे’

हिंदुद्वेष्ट्यांचे वैचारिक उच्चाटन !

हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड !

सातारा पंचायत समिती कार्यालयास लागलेली आग नागरिकांनी विझवली

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात सजावट करण्यात आली होती. १३ सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता अचानक आग लागून संपूर्ण सजावट जळून गेली.