उंचगाव येथे करवीर शिवसेनेच्या पुढाकाराने बँक आपल्या दारी उपक्रम

लाभार्थ्यांची परवड होऊ नये म्हणून करवीर शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने बँक आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत उंचगावात १६ लाख रुपयांच्या रकमेचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले.

रावेरखेडी येथील थोरले बाजीराव पेशवे यांच्या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धारासाठी योजनेची आखणी !

इतिहासाने अजेय योद्धा म्हणून गौरवलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे रावेरखेडी (मध्यप्रदेश) येथील समाधी स्थळाच्या जीर्णोद्धार आणि विकास यांसाठी १०० कोटी रुपयांची योजना आखली आहे.

भारतातील कोरोना संपण्याच्या स्थितीत आला आहे ! – जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन् यांचे मत

भारतातील कोरोना संपण्याच्या स्थितीत आला आहे. या टप्प्यावर अल्प किंवा मध्यम पातळीवर रोगाचा प्रसार चालू रहातो. लोक जेव्हा विषाणूशी जुळवून घेतात, त्या वेळी हा टप्पा येतो. साथीच्या टप्प्यापेक्षा हा टप्पा वेगळा असतो.

‘त्वचेशी त्वचेचा संपर्क झाला नसेल, तर पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा होत नाही’, हा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रहित करा !

कपडे न काढता अल्पवयीन मुलीच्या अंतर्गत भागांना स्पर्श करणे कायद्यानुसार लैंगिक छळाचा गुन्हा आहे. समजा, उद्या सर्जिकल हातमोजे घातलेल्या एखाद्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीच्या संपूर्ण शरिराला स्पर्श केला, तर या निर्णयानुसार त्याला लैंगिक छळाची शिक्षा होणार नाही.

जगातील ६० देशांनी अफगाणिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य थांबवले !

अफगाणिस्तानवरील तालिबानच्या नियंत्रणानंतर अमेरिकेच्या बँकांमधील अफगाण सरकारची खाती सील करण्यात आली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अफगाणिस्तानचे अब्जावधी रुपये परत घेण्यासही बंदी घातली आहे.

अफगाण नागरिकांना देशाबाहेर जाण्याची अनुमती देणार नाही ! – तालिबान

अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यापासून लक्षावधी अफगाण नागरिकांनी देशाबाहेर जाण्यासाठी प्रयत्न चालू केला आहे. यामुळे काबुल विमानतळावर मोठी गर्दी झाली आहे.

जन्मठेप भोगत असलेले सज्जन कुमार यांना जामिनासाठी आरोग्याचा अहवाल सादर करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

जन्मठेप भोगत असलेल्या दोषीला जामीन कशासाठी ? उलट सहस्रो नागरिकांची हत्या करणार्‍याला तर फाशीचीच शिक्षा व्हायला हवी होती !

सीतामढी (बिहार) येथे नर्सिंग होममध्ये झालेल्या अज्ञातांच्या गोळीबारात परिचारिका ठार, तर डॉक्टर घायाळ !

बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे तेथे रुग्णालयावर असे आक्रमण होणे अपेक्षित नाही. तेथील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार काय पावले उचलणार ?

अफगाणिस्तानातून अमेरिकेत आणलेल्या अफगाणी नागरिकांमध्ये सहस्रो आतंकवादी ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

‘भारतातही असेच झाले नाही ना ?’ हे भारतीय सुरक्षायंत्रणांनी पडताळून पहाणे आवश्यक !

तालिबान्यांना जेवण आवडले नाही; म्हणून त्यांनी महिलेला जिवंत जाळले !

तालिबानी पैसे मिळवण्यासाठी अफगाणिस्तानमधील महिलांना शेजारच्या देशांमध्ये विकत आहेत. नोकरदार महिलांना नोकरी करण्यास बंदी करण्यात आली असून त्यांच्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.