जगातील ६० देशांनी अफगाणिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य थांबवले !

तालिबानी आतंकवादी (प्रातिनिधिक छायाचित्र)

काबुल (अफगाणिस्तान) – जगातील ६० देशांनी अफगाणिस्तानला प्रतिवर्षी देण्यात येणारे अब्जावधी डॉलर्सचे साहाय्य थांबवण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र दुसरीकडे चीनने अफगाणिस्तानला साहाय्य करण्याची भूमिका मांडली आहे. अफगाणिस्तानवरील तालिबानच्या नियंत्रणानंतर अमेरिकेच्या बँकांमधील अफगाण सरकारची खाती सील करण्यात आली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अफगाणिस्तानचे अब्जावधी रुपये परत घेण्यासही बंदी घातली आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटले की, अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीला केवळ अमेरिकाच उत्तरदायी आहे. अमेरिका या स्थितीत अफगाणिस्तान सोडून परत जाऊ शकत नाही. युद्धसदृश परिस्थितीचा सामना करणार्‍या अफगाणिस्तानला बळकटी देण्यासाठी चीन आवश्यक पावले उचलेल.