१६ लाख रुपयांच्या रकमेचे सानुग्रह अनुदान वाटप

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) – संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी, आदी सरकारच्या योजनांद्वारे नागरिकांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा मार्केट यार्ड येथे सानुग्रह अनुदान दिले जाते. येथे जाण्यासाठी लाभार्थ्यांना मोठी पायपीट करावी लागते. तरी लाभार्थ्यांची परवड होऊ नये म्हणून करवीर शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने बँक आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत उंचगावात १६ लाख रुपयांच्या रकमेचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. या वेळी सर्वश्री संतोष चौगुले, वसंत मोरे, दीपक रेडेकर, विक्रम चौगुले, महादेव चव्हाण, बाळासाहेब नलवडे, केरबा माने, विराग करी यांसह अन्य उपस्थित होते.
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या कामाची पहाणी !
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !