अफगाणिस्तानातून अमेरिकेत आणलेल्या अफगाणी नागरिकांमध्ये सहस्रो आतंकवादी ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

‘भारतातही असेच झाले नाही ना ?’ हे भारतीय सुरक्षायंत्रणांनी पडताळून पहाणे आवश्यक ! – संपादक

डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – अफगाणिस्तानातून तेथील अफगाणी नागरिकांना देशाच्या बाहेर काढून अमेरिकेत आश्रय देण्यात आला आहे; मात्र त्यांना अमेरिकेत आणले जात असतांना सहस्रो तालिबानी आतंकवादीही त्यातून बाहेर पडले असतील आणि जर असे झाले, तर अमेरिकेसाठी येणारे पुढील दिवस कठीण असतील, असा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मला माहिती मिळाली आहे की, अफगाणिस्तानमधून ज्या २६ सहस्र नागरिकांना बाहेर काढण्यात आले, त्यात केवळ ४ सहस्र अमेरिकी नागरिक आहेत. आपण केवळ कल्पना करू शकतो की, अशा प्रकारे सहस्रो आतंकवाद्यांना बाहेर काढण्यात आले आहे. याची आता चौकशीही होणार नाही. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अशा प्रकारे किती आतंकवाद्यांना अमेरिकेत आणले आहे, हे ठाऊक नाही.