कलोल (गुजरात) येथे धर्मांधांनी गोमांसाने भरलेली गाडी पोलीस ठाण्यावर आक्रमण करून पळवून नेली !

पोलीस ठाण्यासह स्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस काय कामाचे ? उद्या २-३ आतंकवाद्यांनी सशस्त्र आक्रमण केले, तर पोलीस जिवंत तरी राहू शकतील का ? अशांना देण्यात येणारे प्रशिक्षण किती कुचकामी आहे, हेच लक्षात येते !

कराड नगरपालिकेचे कचरा व्यवस्थापन कोलमडले

शहरातील घंटागाड्यांच्या नवीन निविदेची ‘वर्क ऑर्डर’ सिद्ध आहे; मात्र त्यावर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या स्वाक्षर्‍या झाल्या नसल्याने शहरातील घंटागाड्या बंद पडल्या आहेत. कराड शहरातील प्रतिदिन निर्माण होणारा अनुमाने ८ टन कचरा पडून रहात आहे.

सातारा, वाई, कराड आणि फलटण शहरांध्ये ऑनलाईन नोंदणी करणार्‍यांना लस मिळणार

जिल्ह्यातील संपूर्ण पात्र लाभार्थ्यांना नियोजनबद्ध लसीकरण करण्यासाठी जिल्हास्तरावरून योग्य नियोजन करण्यात येत आहे.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री विठ्ठल मंदिराला दिले जाणार ७०० वर्षांपूर्वीचे मूळ रूप

येत्या काही दिवसांमध्ये श्री विठ्ठल मंदिराला ७०० वर्षांपूर्वीचे मूळ रूप दिले जाणार आहे. मागील २ वर्षांपासून पुरातत्व विभाग त्यावर काम करत आहे. चौदाव्या शतकातील हे मंदिर साकारतांना त्यात वाढती गर्दी, संभाव्य धोके आणि अपघात यांचा विचार करून मंदिराची रचना केली जाणार आहे.

निधन वार्ता

बेळगाव येथील अग्रेसर सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुजाता विलास गौंडाडकर (वय ५२ वर्षे) यांचे ९ जुलै या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.

राज्य सरकार बलात्कार्‍यांना राजाश्रय देत आहे ! – सौ. चित्रा वाघ, महाराष्ट्र उपप्रदेशाध्यक्ष, भाजप

राज्यात महिला, मुली यांच्यावरील बलात्काराच्या घटना वाढत आहेत. पोलीसदलात काम करणार्‍या महिलांवरही बलात्कार होत आहेत.

गोव्यातील संचारबंदीत १९ जुलैपर्यंत वाढ

मर्यादित उपस्थितीत धार्मिक स्थळे, निम्म्या क्षमतेने व्यायामशाळा (जीम) आणि प्रेक्षकांविना क्रीडा संकुले खुली करण्यास मान्यता

गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्‍या मार्गांवरील सर्व तपासणी नाके खुले करण्याची शिवशंभू संघटनेची मागणी

सर्व तपासणी नाके खुले व एक मात्रा घेतलेल्यांनाही गोव्यात प्रवेश द्यावा – ‘शिवशंभू संघटना महाराष्ट्र’

(म्हणे) ‘चर्च संस्थेने दबलेल्यांना मुक्त करण्याची मोहीम पुढे चालूच ठेवावी !’ – गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव

श्रद्धांजली वहाणारे फादर स्टेन स्वामी यांच्यावरील य गुन्ह्यांविषयी एकही चकार शब्द का बोलत नाहीत ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण

जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण ५ सहस्र ७६० लसी उपलब्ध झाल्या आहेत.