फादर स्टेन स्वामी यांना गोव्यात चर्च संस्थेकडून ‘ऑनलाईन’ श्रद्धांजली
फादर स्टेन स्वामी यांना ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’ने (‘एन्.आय.ए.’) देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली कह्यात घेतले होते. त्यांच्यावर नक्षलवादाला साहाय्य करणे आणि अवैध कृत्ये करणे, हे गंभीर गुन्हे प्रविष्ट होते. श्रद्धांजली वहाणारे फादर स्टेन स्वामी यांच्यावरील या गुन्ह्यांविषयी एकही चकार शब्द का बोलत नाहीत ? कि त्यांचा फादर स्टेन स्वामी यांच्या या भूमिकेला पाठिंबा आहे ? असा प्रश्न कुणालाही पडल्यास त्यात नवल नाही ! – संपादक
पणजी, ११ जुलै (वार्ता.) – फादर स्टेन स्वामी यांचा आवाज दाबण्यात आला; मात्र असे असूनही लोकांमधून आणखी स्टेन जन्माला येणार आहेत आणि त्यांच्या साहाय्याने भारतातील चर्च संस्था दबलेल्यांना मुक्त करण्याची मोहीम पुढे चालूच ठेवणार आहे, असे विधान गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव यांनी केले. (फादर स्टेन स्वामी दबलेल्यांना मुक्त करत होते कि नक्षलवादी कारवायांना साहाय्य करत होते ? चर्च संस्थेचा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेवर विश्वास नाही का ? कि त्यांना येथील अन्वेषण यंत्रणा, कायदे, न्याययंत्रणा यांपेक्षा त्यांच्या धर्मातील व्यक्ती अधिक थोर वाटतात ? – संपादक) फादर स्टेन स्वामी यांना वहाण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव हे ‘कॅथॉलिक बिशप्स ऑफ इंडिया’चे अध्यक्ष आहेत. ‘जेसूट ऑफ वेस्ट झोन प्रोव्हीन्स ऑफ इंडिया’ या संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आर्चबिशप फेर्राव पुढे म्हणाले, ‘‘फादर स्टेन स्वामी यांनी भारतातील दबलेल्यांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी, गरीब जमातीतील लोकांच्या हक्कासाठी लढा दिला. फादर स्टेन स्वामी यांचा आवाज दाबलेल्यांना आज त्यांच्या मार्गातील एक अडथळा दूर झाल्याचा आनंद होत असेल.’’
(गोमंतकीय हिंदूंवर इन्क्विझिशनद्वारे क्रूर अत्याचार करण्याचा सल्ला देणारा फ्रान्सिस झेवियर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गोव्यात प्रतिवर्षी जत्रा भरवली जाते आणि त्याचा उदोउदो केला जातो. त्या वेळी हिंदूंचा आवाज दाबलेला असतो. ओडिशा येथे आदिवासींची सेवा करणारे स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची ख्रिस्ती माओवाद्यांनी हत्या करून हिंदूंचा धर्मांतराच्या विरोधातील आवाज दाबला. याविषयी आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक)