सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांना ‘कोविशिल्ड’ लसीची दुसरी मात्रा (डोस) १२ जुलै या दिवशी देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण ५ सहस्र ७६० लसी उपलब्ध झाल्या आहेत. या वेळी ४५ वर्षांखालील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. दुसरा डोस देण्यात येणार्या लाभार्थ्यांची सूची संबंधितांना पाठवण्यात आली आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.