पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येत्या काही दिवसांमध्ये श्री विठ्ठल मंदिराला ७०० वर्षांपूर्वीचे मूळ रूप दिले जाणार आहे. मागील २ वर्षांपासून पुरातत्व विभाग त्यावर काम करत आहे. चौदाव्या शतकातील हे मंदिर साकारतांना त्यात वाढती गर्दी, संभाव्य धोके आणि अपघात यांचा विचार करून मंदिराची रचना केली जाणार आहे. मंदिराला मूळ रूप देण्यासाठी आराखडा सिद्ध करण्याचे काम चालू आहे. लवकरच पुरातत्व विभाग आणि मंदिराच्या पुढील बैठकीत याचा पक्का आराखडा तयार करून तो राज्य सरकारकडे संमत होण्यासाठी पाठवण्यात येणार आहे.
यामध्ये मंदिराची १४ व्या शतकाप्रमाणे रेखीव दगडात बांधणी केली जाणार आहे. मंदिराला देण्यात आलेले रंग, सिंमेटचे बांधकाम, चकचकीत फरशा काढण्यात येणार असून नामदेव पायरीपासून ते गाभार्यापर्यंत सर्व पालट केले जाणार आहेत. मंदिराचे एकूण बांधकाम हे १२ टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. या सर्व कामासाठी ४२ कोटी रुपये व्यय अपेक्षित आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट, प्राचीन स्वरुप जपण्यासाठी केले जाणार प्रयत्नhttps://t.co/VSkyG2LVvJ#Pandharpur | #Vitthal | #temple
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 8, 2021