सावंतवाडी – गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्या मार्गांवर असणारे सर्व तपासणी नाके लवकरात लवकर खुले करण्यात यावेत. कोरोना प्रतिबंधक लसीच्या २ मात्रा (डोस) घेतलेल्यांना गोव्यात प्रवेश देण्याविषयी गोवा सरकारने घेतलेला निर्णय पालटून एक मात्रा घेतलेल्यांनाही गोव्यात प्रवेश द्यावा, अशी मागणी ‘शिवशंभू संघटना महाराष्ट्र’च्या सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे करण्यात आली. या मागणीच्या अनुषंगाने लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिल्याचे संघटनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले. या वेळी शिवशंभू संघटनेचे िसंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष समीर सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष रामचंद्र कवठणकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष यामेश्वर कवठणकर, सदस्य उमेश मांजरेकर आणि वैभव चोडणकर उपस्थित होते.