पुस्तकावर संपूर्ण देशात बंदी घालण्याच्या मागणीसाठी राजे प्रतिष्ठान दुर्गसंवर्धन विभागाचेही निवेदन !

गिरीश कुबेर

कल्याण – गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर महाराष्ट्र्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात बंदी घालावी, असे निवेदन कल्याण येथील राजे प्रतिष्ठान दुर्गसंवर्धन विभागाच्या वतीने कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराजे साळवे आणि कल्याणचे तहसीलदार श्री. दीपक आकडे यांना दिले. ‘या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी आणि गिरीश कुबेर यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवावा’, अशी मागणी कल्याण येथील राजे प्रतिष्ठान दुर्गसंवर्धन विभागाचे राहुल महाजन यांनी केली आहे.