…तर निर्बंध अधिक कडक केले जातील ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई – कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही, असे असतांना मी मेट्रोच्या कार्यक्रमाला जातांना रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी दिसली. ही चिंताजनक गोष्ट आहे. नागरिकांनी असाच मुक्त संचार चालू केला, तर निर्बंध अधिक कडक केले जातील, अशी चेतावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ३१ मे या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे ‘मेट्रो २ ए’ आणि ‘मेट्रो ७’ यांच्या चाचणीचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला जातांना मुंबईच्या रस्त्यावरील वाहतूककोंडी पाहून त्यांनी वरील चेतावणी दिली.

याविषयी असंतोष व्यक्त करतांना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘३० मेच्या रात्री जनतेशी संवाद साधतांना मी चुकून निर्बंध उठवण्याची घोषणा केली कि काय ? असे मला वाटू लागले आहे; पण मी संवादामध्ये कुठेच असे बोललो नव्हतो. मी कोणतेही निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतलेला नाही.’’