अमरावती – च्या संकटकाळात शहरातील महादेव खोरी परिसरातील ‘वर्हाड’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र वैद्य यांनी पुढाकार घेत अनेकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. मागील १४ मासांपासून त्यांनी गरीब लोकांसाठी अन्नदान चालू करून त्या माध्यमातून आतापर्यंत लाखो लोकांची भूक भागवली आहे.
गेल्या वर्षी दळणवळण बंदीमुळे पुणे-मुंबई येथील कामगार गावाकडे परत जात होते. त्या सर्वांसाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रवींद्र वैद्य यांनी विनामूल्य भोजन व्यवस्था केली. शहरातील झोपटपट्टी भागात वाहनांतून गरजूंना भोजन दिले जाते. अनेकजण तेथे डबे घेऊन जातात. ‘भोजनाची सोय झाली म्हणून बरे झाले, अन्यथा भीक मागण्याची वेळ आली असती’, असे डबे घ्यायला आलेले नागरिक सांगतात. ‘वर्हाड’ या संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जाणार्या या अन्नछत्रातून सहस्रो लोकांना प्रतिदिन वरण, भात, भाजी आणि पोळी असे चांगल्या दर्जाचे भोजन दिले जाते. समवेतच सणासुदीला गोडधोड भोजनही दिले जाते’, अशी माहिती रवींद्र वैद्य यांनी दिली.