मुंबई – तौक्ते चक्रीवादळात तराफा बुडाल्याच्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी १०० हून अधिक कर्मचार्यांचे जबाब नोंदवले, तसेच तराफ्याशी संबंधित आस्थापनाच्या कर्मचार्यांची चौकशी पोलिसांनी चालू केली आहे. तौक्ते चक्रीवादळात ‘पी ३०५‘ तराफा बुडून ७५ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी येलो गेट पोलिसांनी गुन्हा नोंदवून ४ आस्थापनांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे.