शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना दाखला दिल्याप्रकरणी वॉलनट शाळेची चौकशी होणार !

या प्रकरणाची तात्काळ चौकशी होऊन शाळा दोषी आढळल्यास तिची मान्यता रहित करावी !

पुणे – शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले दिल्याने फुरसुंगी आणि वारजे येथील वॉलनट शाळेच्या चौकशीचे आदेश राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने दिले. चौकशी करून शाळेला सूचना करण्याच्या आदेशाचे पत्र आयोगाने शिक्षण उपसंचालकांना दिले. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याने आयोगाने कार्यवाही केली. कार्यवाही अहवाल २० दिवसांत आयोगाकडे पाठवण्याचे नमूद केले आहे. शुल्क हप्त्यांमध्ये देण्यासाठी शाळेकडे विचारणा केली; मात्र तशी सोय उपलब्ध नसल्याचे पालकांनी सांगितले. (यावरून शिक्षणाचे व्यावसायिकीकरण झाल्याचेच लक्षात येते ! – संपादक)