कठडा कोसळण्याआधी प्रशासनाला कळत कसे नाही ?

‘चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे १८.५.२०२१ या दिवशी मुंबईचे दक्षिणद्वार असलेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’चा संरक्षक कठडा तुटला आहे.’

खांडवा येथे १७ वर्षे जुन्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्याचा अयशस्वी प्रयत्न !

येथे राज्याचे वनमंत्री विजय शहा यांनी रुग्णवाहिकेला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला असता ती चालूच झाली नाही. तिला धक्काही मारण्यात आला, तरीही ती जागची हलली नाही.

रुग्णाच्या मृत्यूनंतर आधुनिक वैद्यास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद !

कोरोनाबाधितावर उपचार चालू असतांना त्याचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी आधुनिक वैद्य आणि रुग्णालयातील कर्मचारी यांना मारहाण केली. या प्रकरणी २ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अरबी समुद्रातील ‘बार्ज ३०५’ या जहाजावरील घटना दुर्दैवी ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

‘तौक्ते’ वादळामुळे अरबी समुद्रातील ‘बार्ज ३०५’ या जहाजावर झालेली घटना दुर्दैवी आहे. या वादळामुळे मोठी हानी झाली आहे. या दुर्घटनेविषयी केंद्र सरकारने चौकशीचे निर्देश दिले आहेत.

नागपूरसह देशात ४ ठिकाणी मुलांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची चाचणी होणार !  – आधुनिक वैद्य समीर पालतेवार

‘नागपूरसह पाटणा, देहली आणि भाग्यनगर (हैद्राबाद) या देशातील ४ ठिकाणी लहान मुलांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी देशातील २ ते १८ वयोगटांतील ५२५ मुलांची निवड करण्यात येणार आहे.

वैशाख मासातील (२३.५.२०२१ ते २९.५.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘१२.५.२०२१ या दिवसापासून वैशाख मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

पी-३०५ तराफ्याच्या कॅप्टनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद !

तौक्ते चक्रीवादळामध्ये पी-३०५ या तराफ्यावरील कामगारांचा जीव धोक्यात घातल्यामुळे कॅप्टन राकेश बल्लव आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँक केंद्र सरकारला देणार ९९ सहस्र १२२ कोटी रुपये !

देश कोरोनामुळे संकटात असतांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारला ९९ सहस्र १२२ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या केंद्रीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सस्नेह निमंत्रण !

तिमिराकडून तेजाकडे…! वाटचाल हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयपूर्तीकडे !!
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा ‘ऑनलाईन’ २२ वा वर्धापनदिन सोहळा !

असे अपघात आणखी किती वर्षे चालू रहाणार ?

मोगा (पंजाब) येथे वायूदलाचे मिग २१ हे लढाऊ विमान कोसळून झालेल्या अपघातात वैमानिक अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला.