रिझर्व्ह बँक केंद्र सरकारला देणार ९९ सहस्र १२२ कोटी रुपये !

नवी देहली – देश कोरोनामुळे संकटात असतांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारला ९९ सहस्र १२२ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या केंद्रीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जुलै २०२० ते मार्च २०२१ या ९ मासांच्या कालावधीत मिळालेली सरप्लस रक्कम रिझर्व्ह बँक केंद्र सरकारला देणार आहे. याआधी २०१९ मध्ये रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला १ लाख ७६ सहस्र कोटी रुपये दिले होते.