अशा मारहाणीच्या घटना या कायदा-सुव्यवस्थेसाठी चिंताजनक !
नगर – कोरोनाबाधितावर उपचार चालू असतांना त्याचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी आधुनिक वैद्य आणि रुग्णालयातील कर्मचारी यांना मारहाण केली. या प्रकरणी २ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पंकज गडाख आणि रोहन पवार अशी या आरोपींची नावे आहेत. तारकपूर येथील सिटीकेअर रुग्णालयात ही घटना घडली.
तानाजी गडाख (वय ७८ वर्षे) या कोरोनाबाधितावर उपचार चालू असतांना त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती कर्मचार्यांनी नातेवाइकांना सांगितल्यानंतर पंकज आणि रोहन यांनी आधुनिक वैद्य ठोकळ अन् कर्मचारी गायकर यांना मारहाण करून बाह्य रुग्णकक्षात तोडफोड केली.
‘नागपूरमधील एका रुग्णालयात रुग्णांवर व्यवस्थित उपचार केले जात नाहीत, हलगर्जीपणा केला जातो’, अशी तक्रार रुग्णाच्या नातेवाइकांनी तेथील आधुनिक वैद्यांकडे केली. ‘या तक्रारीचा राग येऊन आधुनिक वैद्यानेच रुग्णाच्या नातेवाइकांना मारहाण केली’, अशी तक्रार पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.