‘रेमडेसिविर’चा साठा केल्यावरूनच ‘ब्रुक फार्मा’च्या अधिकार्‍यावरील पोलिसांच्या कारवाईवरून विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी यांच्यात कलगीतुरा !

पोलिसांनी केलेल्या कारवाईत राजेश डोकानिया यांना विलेपार्ले येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड हेही तेथे आले. या ठिकाणी पोलिसांसमवेत त्यांचा शाब्दिक वाद झाला.

श्रीरामनवमीच्या दिवशी घरीच राहून पूजा करा !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येतील साधू-संतांचे आवाहन

अमरावती येथे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने केवळ दुपारी ३ वाजेपर्यंतच खुली !

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदीच्या काळात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत; मात्र अमरावती येथे शहरातील नागरिकांची गर्दी अल्प होत नसून रुग्णही वाढत आहे.

नागपूर येथे पोलिसांनी राबवलेल्या उपक्रमात १८ वाहनचालकांची कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ !

रस्त्यांवरील नागरिकांची गर्दी अल्प करण्यासाठी शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशाने शहरात ६० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. यांपैकी ५ ठिकाणी वाहनचालकांची ‘रॅपिड अँटीजेन कोविड’ चाचणी घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

सोलापूर जिल्ह्यात १६ दिवसांत १५ सहस्र कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण

एप्रिलमधील १६ दिवसांत कोरोनाच्या दीड लाख चाचण्या करण्यात आल्या असून १५ सहस्र १३८ जण ‘पॉझिटिव्ह’ आढळले आहेत, तर २६७ जणांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या लाटेहून या लाटेचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्याचे आधुनिक वैद्यांचे म्हणणे आहे.

(म्हणे) ‘अमित शहा यांची बांगलादेशविषयी माहिती मर्यादित आणि तोकडी !’

भारतात अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी घुसखोरांना बांगलादेशानी मायदेशी बोलावून त्यांना पोसावे !

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या साहाय्याने कोरोना रुग्णांसाठी २०० ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार !

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने भक्त निवास येथील कोरोना केंद्रामध्ये २०० ऑक्सिजन बेड सेंटर कार्यान्वित करण्यात येत आहेत. या सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे ऑक्सिजन बेड सेंटर जिल्ह्यातील कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत.

मातृभूमीसाठी प्राणांचे बलीदान करणारे अनंत कान्हेरे !

नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जॅक्सन नावाचा क्रूर अधिकारी होता. जॅक्सन वधाच्या आरोपाखाली अनंतराव आणि त्यांचे सहकारी अण्णा कर्वे अन् विनायक देशपांडे यांना १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या कारागृहात सकाळी ७ वाजता फाशीची शिक्षा झाली.

पुण्यामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू !

पुण्यातील जाधव कुटुंबातील ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कुटुंबातील सर्वांना संसर्ग होऊन केवळ १५ दिवसांत ५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.