तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने भक्त निवास येथील कोरोना केंद्रामध्ये २०० ऑक्सिजन बेड सेंटर कार्यान्वित करण्यात येत आहेत. या सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे ऑक्सिजन बेड सेंटर जिल्ह्यातील कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत.
१. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच विश्वस्त तथा उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, तहसीलदार सौदागर तांदळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी या विश्वस्तांच्या सहकार्याने हे काम चालू करण्यात आले आहे. प्रशासकीय व्यवस्थापक योगिता कोल्हे या कामाची देखरेख करत आहेत.
२. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान या ऑक्सिजन बेड सेंटरसाठी ३० लाख रुपये व्यय करणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान हे धार्मिक संस्थान असल्याने या सेंटरसाठी उपकरणांचा पुरवठा करणारी आस्थापने अल्प दरात साहित्य उपलब्ध करून देणार आहेत.