‘स्वयंपाक करतांना नामजप करणे महत्त्वाचे आहे’, याविषयी साधकाला आलेले अनुभव !

स्वयंपाक करतांना मन एकाग्र असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला ‘कुठली कृती करायला हवी ?’, हे सुचते. ‘हे केवळ देवाच्या अनुसंधानात (म्हणजेच नामात) राहिल्यामुळे शक्य होऊ शकते’, याची मला अनुभूती आली.

स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात भावाच्या स्तरावर व्यायामप्रकार करून आनंद अनुभवणार्‍या रामनाथी आश्रमातील साधिका कु. गुलाबी धुरी !

मी २ – ३ मास स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाला गेले नाही. तेव्हा ‘पूर्वीप्रमाणे मला व्यायाम प्रकार करायला जमत नाही’, असा विचार येऊन मला निराशा आली. नंतर व्यायाम प्रकार करतांना त्यांना भावाची जोड दिल्यावर मला पूर्वीप्रमाणेच सर्व प्रकार जमू लागले आणि प्रशिक्षण करतांना आनंदही मिळाला.