(म्हणे) ‘अमित शहा यांची बांगलादेशविषयी माहिती मर्यादित आणि तोकडी !’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ‘उपासमार टाळण्यासाठी बांगलादेशातील गरीब लोक भारतात येतात’, या विधानावर बांगलादेशकडून तीव्र प्रतिक्रिया !

बांगलादेशाच्या गृहमंत्र्यांना भारताच्या गृहमंत्र्यांचे विधान झोंबले असेल, तर त्यांनी तात्काळ भारतात अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी घुसखोरांना मायदेशी बोलावून त्यांना पोसावे !

अमित शहा

ढाका (बांगलादेश) – बंगालमधील निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी ‘बांगलादेशमध्ये पुरेसे अन्न नसल्यामुळे उपासमार टाळण्यासाठी अनेक गरीब लोक भारतात येतात’, असे विधान केले होते. त्यावर बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए.के. अब्दुल मोमेन यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मोमेन म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा यांची बांगलादेशविषयी माहिती मर्यादित आणि तोकडी आहे. बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध घट्ट असतांना अशी विधाने टाळण्याची आवश्यकता आहे. अशा विधानांवरून अपसमज निर्माण होत आहेत. बांगलादेशमध्ये कुणीही उपाशी नाही. बांगलादेशातील उत्तर भागाील जिल्ह्यांमध्ये दारिद्य्र आणि उपासमार नाही. बांगलादेश अनेक क्षेत्रात भारतापेक्षाही पुढे आहे. बांगलादेशातील ९० टक्के लोक चांगले शौचालय वापरतात, तर भारतातील ५० टक्क्यांंहून अधिक लोकांकडे शौचालये नाहीत.