सोलापूर – येथे एप्रिलमधील १६ दिवसांत कोरोनाच्या दीड लाख चाचण्या करण्यात आल्या असून १५ सहस्र १३८ जण ‘पॉझिटिव्ह’ आढळले आहेत, तर २६७ जणांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या लाटेहून या लाटेचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्याचे आधुनिक वैद्यांचे म्हणणे आहे. शहरात सर्वच भागात कोरोनाचा संसर्ग दिसून येत असून शहराच्या दुप्पट ग्रामीण भागात प्रतिदिन रुग्ण आढळत आहेत. पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा, बार्शी या तालुक्यांत रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.