पणजी – गुन्हे अन्वेषण विभागाने पेडणे तालुक्यातील मोरजी येथे छापा टाकून उच्चभ्रू लोकांचा सहभाग असलेले वेश्याव्यवसाय रॅकेट उघडकीस आणले आहे. यामध्ये ३ पीडित मुलींना सोडवण्यात आले आहे. यामधील एक मुलगी उज्बेक देशाची नागरिक आहे. या प्रकरणी हैद्राबाद येथील राज चावला याला कह्यात घेण्यात आले आहे. यामध्ये अजूनही वेश्याव्यावसायिक गुंतल्याचा पोलिसांना संशय आहे.