‘श्री परशुराम गोमंतक सेने’चे शैलेंद्र वेलिंगकर यांचे आवाहन

पणजी – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या आतंकवादाशी निगडित संघटनेचे सक्रीय कार्यकर्ते रियाझ काद्री यांची पत्नी समीना रियाझ काद्री या मुरगाव नगरपालिकेच्या प्रभाग १० मध्ये उमेदवार आहेत. पालिका निवडणुकीत मतदारांनी सतर्कता बाळगून आतंकवादी संघटनेचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला आपले मत देऊ नये, असे आवाहन ‘श्री परशुराम गोमंतक सेने’चे श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांनी ‘फेसबूक’च्या माध्यमातून केले आहे.
यामध्ये श्री. शैलेंद्र वेलिंगकर पुढे म्हणतात, ‘‘पी.एफ्.आय.’ ही संघटना गरिबांना साहाय्य करणारी (चॅरिटी) एक संघटना असल्याचे भासवत आहे. नागरिकांनी ‘गूगल’वरून ‘पी.एफ्.आय.’विषयी अधिक माहिती जाणून घ्यावी. ही एक देशविघातक संघटना आहे. ‘पी.एफ्.आय.’वर बंदी न घालणे हे गोवा शासनासाठी लज्जास्पद आहे. मुरगाव नगरपालिकेतून प्रभाग १० म्हणजे मांगोर, गांधीनगर आदी भागांतील मतदारांनी सतर्क रहावे.’’
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !