सातारा येथे पोलीस ठाण्याच्या बिनतारी संदेशवाहक मनोर्‍यावर चढून युवकाचे आंदोलन

शेतातील पिकाची चोरी होत असल्याविषयी पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने भुरकवडी (जिल्हा सातारा) येथील युवकाने पोलीस ठाण्याच्या बिनतारी संदेशवाहक मनोर्‍यावर चढून आंदोलन केले.

बाह्यशक्तींच्या साहाय्याने गोव्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

बाह्यशक्तींच्या साहाय्याने गोव्यात अस्थिरता निर्माण करण्याचा विरोधक प्रयत्न करत आहेत. गोवा राज्य गेली अनेक मास हे भोगत आहे, असा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

पुणे येथे पोलिसांकडूनच पोलिसी गणवेश घालण्याच्या नियमांचे पालन नाही

नागरिकांना शिस्तीचे धडे देणारे पोलीसच शिस्त पाळत नसतील, तर अशा पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक कसा रहाणार ?

सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक खासदारांना आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना भेटण्यापासून गाझीपूर सीमेवर पोलिसांनी रोखले !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशभरातील अनेक खासदार देहलीच्या गाझीपूर सीमेवर शेतकर्‍यांना भेटण्यासाठी पोचले असता त्यांना देहली पोलिसांनी सीमेवरच अडवले.

शरजील उस्मानी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करा आणि आणि एल्गार परिषदेवर कायमची बंदी घाला ! – नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

एल्गार परिषदेमुळेच दंगल घडनूही यंदा प्रथम अनुमती नाकारून नंतर अचानक अनुमती देण्यामागचे गौडबंगाल काय ?

भारतद्वेषाचा ‘पुळका’ !

राजधानी देहली येथे साधारण ७२ दिवसांपासून चालू असलेले आंदोलन म्हणजे भारताला अस्थिर करण्याचा एक सुनियोजित कटच आहे. २६ जानेवारीला या आंदोलनकर्त्यांनी देहलीतील लाल किल्ल्यावर जो हैदोस घातला, त्यावरून हे भारताच्या मुळावरच उठलेले आंदोलन आहे, हे सूर्यप्रकाशासम स्पष्ट झाले.

पनवेलच्या बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावणार्‍या छोट्या राजनच्या हस्तकाला पुणे येथून अटक

पनवेल येथील बांधकाम व्यावसायिक नंदू वाझेकर यांच्याकडे २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी परमानंद हंसराज ठक्कर या छोट्या राजनच्या हस्तकाला पुण्याच्या कोंढव्यातून अटक केली आहे.

एका कर्माचे फळ भोगतांना त्यातून पुन्हा नवीन फळ निर्माण होणे आणि अशा प्रकारे ही शृंखला वाढतच जाणे

आपण आपल्या एका पापकर्माचे वाईट फळ भोगतो. तेव्हा मनुष्य स्वभावानुसार आपल्याला दुःख होते, इतरांवर चिडचीड होते. त्यामुळे त्यातून पुन्हा नवीन कर्म निर्माण होऊन त्याचे फळ आपल्याला लागू होते.

शेळकेवाडी (तालुका कवठेमहांकाळ) येथे भेसळयुक्त दूध जप्त

भेसळीच्या संशयावरून शेळकेवाडी (तालुका कवठेमहांकाळ) येथे ४ फेब्रुवारी या दिवशी मे. सटवाई दूध संकलन केंद्रावर धाड टाकून एक लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

जीवनातील मूल्यांची जोपासना करणे अत्यंत आवश्यक !

धनाचे उपार्जन (प्राप्ती) करणे, ही चांगली गोष्ट आहे; पण जीवनाची मूल्ये त्याहून अधिक महत्त्वाची आहेत. त्यांची जोपासना करणे अत्यंत आवश्यक आहे.