पुणे येथे पोलिसांकडूनच पोलिसी गणवेश घालण्याच्या नियमांचे पालन नाही

नागरिकांना शिस्तीचे धडे देणारे पोलीसच शिस्त पाळत नसतील, तर अशा पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक कसा रहाणार ?

पुणे – पोलिसांनी कर्तव्यावर असतांना पोलिसांनी खाकी गणवेश, हातात काठी आणि डोक्यावर पोलिसांची टोपी घालणे बंधनकारक आहे; मात्र सध्या पोलिसांची टोपी त्यांच्या खिशात असते. केवळ वरिष्ठांच्या समोरच पोलीस टोपी घालतात. येथील शहर पोलीस विभागात काम करणार्‍या काही मोजक्या पोलिसांना कधीच गणवेशात पाहिले नसल्याचे काहींनी सांगितले. गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस ठाण्यातील तपास पथक (डीबी) विभागातील पोलिसांना गणवेश न घालण्याची मुभा देण्यात आली आहे; पण वर्षानुवर्षे अनेक पोलीस डीबी पथक आणि गुन्हे शाखा या अंतर्गत काम करत असल्यामुळे ते बंदोबस्त वगळता कधीच गणवेश घालतांना दिसत नाहीत. अपुर्‍या गणवेशामुळेच अलीकडे पोलिसांवर आक्रमणे होण्याचे प्रकारही घडत आहेत.