रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या विरोधात लाखो लोक मॉस्कोच्या रस्त्यांवर !

विरोधी पक्षनेते एलेक्सी नवेलनी यांच्या अटकेनंतर रशियामध्ये राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधात लाखो लोक राजधानी मॉस्कोच्या रस्त्यांवर उतरले आहेत. रशियातील सुमारे १०० शहरांमध्ये लोक रस्त्यांवर उतरले आहेत.

राजधानी देहलीच्या खान मार्केटमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

कराची, लाहोर, इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी या पाकमधील शहरांमध्ये कधी ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस कुणी करू शकेल का ? मग भारतात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस होतेच कसे ?

चीनने स्वतःच्याच प्रस्तावाचे उल्लंघन करत प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर सैनिकांची संख्या वाढवली !

विश्‍वासघातकी चीनवर कधीही विश्‍वास ठेवता येणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने आता ‘ठकासी व्हावे महाठक’ या संतवचनानुसार वागणेच योग्य !

भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या ३ बँका सुरक्षित आहेत ! – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

आरबीआयने D-SIB (Domestic Systemically Important Banks) सूची प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये हिंदु पुजारी अंत्यसंस्कारासाठी अधिक शुल्क उकळत असल्याचा आरोप

कोरोनाच्या संकट काळात पुजार्‍यांकडून अशा कृती होत असतील, तर त्या अयोग्यच होत !

वर्षाला १५ लाख रुपये वेतन घेणार्‍या सनदी लेखापाल पायल शहा संन्यास घेऊन जैन साध्वी बनणार !

पैशांद्वारे शाश्‍वत आनंद घेता येत नाही, हे ज्याच्या लक्षात येते तोच अशा प्रकारचा धाडसी निर्णय घेऊ शकतो आणि पुढे ईश्‍वर त्याचे जन्मभर योगक्षेमं वहातो !

शंकर बँकेची माहिती (डेटा) ‘हॅकर’ला पुरवल्याचा पोलिसांना संशय

ऑनलाईन’ दरोडा प्रकरणी बँकेशी संबंधित व्यक्तीकडूनच बँकेची महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती ‘हॅकर्स’ला ‘कमिशन’वर पुरवली गेली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

नेर (यवतमाळ) येथे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ५ जणांना अटक

तालुक्यातील बाणगाव येथे एका सायंकाळी ख्रिस्ती धर्माचा प्रसार चालू होता. ही गोष्ट भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल राठोड यांच्या लक्षात येताच त्यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी पोचून ख्रिस्ती धर्मप्रसारकांना घेराव घातला

‘स्कूल गेम्स फेडरेशन’ची बनावट बँक खाती उघडून विविध राज्यांतील क्रीडा विभागांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

फेडरेशनचे माजी महासचिव राजेश मिश्रा यांनी बनावट ‘पॅन कार्ड’ आणि बँक खाते क्रमांक यांद्वारे ही फसवणूक केली आहे. यात महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाची ८६ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

हिंदु जनजागृती समितीची प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा मोहीम !

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आली त्याचा वृत्तांत . …