शंकर बँकेची माहिती (डेटा) ‘हॅकर’ला पुरवल्याचा पोलिसांना संशय

  • शंकर नागरी सहकारी बँकेवर ‘ऑनलाईन’ दरोडा घातल्याचे प्रकरण

  • देहली येथून ३ जण कह्यात

नांदेड – येथील आयडीबीआय बँकेत असलेल्या शंकर नागरी सहकारी बँकेच्या खात्यातील १४ कोटी ५० लाख रुपयांचा ‘ऑनलाईन’ दरोडा घातल्याप्रकरणी येथील  पोलिसांनी २ महिलांसह एका ‘हॅकर’ला देहली येथून कह्यात घेतले आहे. या ‘ऑनलाईन’ दरोडा प्रकरणी बँकेशी संबंधित व्यक्तीकडूनच बँकेची महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती ‘हॅकर्स’ला ‘कमिशन’वर पुरवली गेली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

१. या प्रकरणी वजिराबाद पोलिसांनी कर्नाटक राज्यातून २ संशयित महिलांसह एका ‘हॅकर’ला कह्यात घेतले आहे.

२. यातील एका महिलेचे नायजेरियन ‘फ्रॉड’ करणार्‍या व्यक्तीशी संपर्क असल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे. देहली येथील मोहनपुरा भागात नायजेरियनबहुल वस्तीतून ‘हॅकिंग’चे प्रकार होत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

३. आतापर्यंतच्या अन्वेषणावरून ‘हॅकर्स’ला बँकेचा डेटा पुरवणारी एखादी टोळी आहे.