दक्षिण आफ्रिकेमध्ये हिंदु पुजारी अंत्यसंस्कारासाठी अधिक शुल्क उकळत असल्याचा आरोप

कोरोनाच्या संकट काळात पुजार्‍यांकडून अशा कृती होत असतील, तर त्या अयोग्यच होत !

जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) – दक्षिण आफ्रिकेतील हिंदु पुजारी अंत्यसंस्काराच्या वेळी अधिक शुल्क वसूल करत आहेत, जे योग्य नाही, अशी पोस्ट दक्षिण आफ्रिकेतील ‘हिंदु धर्म असोसिएशन’चे सदस्य आणि डरबन येथील ‘क्लेयर इस्टेट क्रिमेटोरियम’चे व्यवस्थापक प्रदीप रामलाल यांनी सामाजिक माध्यमात करून पुजार्‍यांकडून कोरोनाच्या काळात अधिक शुल्क घेण्याच्या कृतीचा विरोध केला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

‘धर्मग्रंधानुसार ही समाजसेवा आहे. जर एखादे कुटुंब या क्रियेसाठी दान देऊ इच्छित असेल, तर ते योग्य आहे; मात्र पुजार्‍यांनी यासाठी शुल्क मागणे योग्य नाही’, असे रामलाल यांनी ‘पोस्ट’मध्ये म्हटले आहे. रामलाल यांच्याकडे पुजार्‍यांकडून अंत्यसंस्काराच्या वेळी अधिक शुल्क घेण्यात आल्याच्या तक्रारी आल्यानंतर त्यांनी ही पोस्ट केली आहे. येथे भारतीय वंशाचे १३ लाख लोक रहात आहेत. रामलाल यांनी तेथील हिंदूंना आवाहन केले आहे की, आजच्या कठिण परिस्थितीत अशा आर्थिक शोषणापासून वाचण्यासाठी अंत्यसंस्काराचा व्हिडिओ पाहून स्वतःच ही क्रिया करावी.