भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या ३ बँका सुरक्षित आहेत ! – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्यवहार आणि भविष्यातील गुंतवणूक यांसाठी कोणत्या बँका सुरक्षित आहे ना, याची माहिती दिली आहे. ‘भारतीय स्टेट बँक (SBI), आयसीआयसीआय बँक (ICICI) आणि एचडीएफसी बँक (HDFC) या ३ बँकांमध्ये तुमच्या ठेवी सुरक्षित आहेत’, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. आरबीआयने  D-SIB (Domestic Systemically Important Banks) सूची प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे.

डीएस्आयबी सूचीद्वारे घोषित केलेल्या बँका या विश्‍वासार्ह आहेत. वरील ३ बँकांमध्ये जर खाते असेल, तर पैशांची चिंता करण्याची आवश्यकता नाही.

आरबीआयने म्हटले आहे की, वरील ३ बँकांनी अनेकांना कर्ज दिले आहे. तरीही कोरोनासारख्या प्रतिकूल परिस्थितीत या बँकांवर कोणताही परिणाम झाला नाही.