चीनने स्वतःच्याच प्रस्तावाचे उल्लंघन करत प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर सैनिकांची संख्या वाढवली !

विश्‍वासघातकी चीनवर कधीही विश्‍वास ठेवता येणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने आता ‘ठकासी व्हावे महाठक’ या संतवचनानुसार वागणेच योग्य !

चीनने लडाखमधील सैनिकांची संख्या गुपचूप वाढवली आहे.

बीजिंग (चीन) – चीनने ४ मासांपूर्वीच लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील सैनिकांची संख्या भारत आणि चीन या दोन्ही देशांनी वाढवायची नाही, असा प्रस्ताव दिला होता; मात्र त्याच्याकडूनच या प्रस्तावाचे उल्लंघन करण्यात आल्याचे उघड झाले आहे. चीनने लडाखमधील सैनिकांची संख्या गुपचूप वाढवली आहे. यामुळे सीमेवरील तणावात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

चीनने दौलत बेग ओल्डीजवळच्या नव्या जागांवरही सैनिकांची संख्या वाढवली  आहे. चीनच्या या हालचाली पहाता भारतीय सैन्य सतर्क झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी भारतीय सैन्याकडून घेतली जात आहे.